॥ श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न ॥ ॥ श्री गजानन प्रसन्न ॥ ॥ श्री कुलस्वामिनी प्रसन्न ॥
ॐ
रितिक आणि भारती यांचा छायाचित्र
रितिक ♥ भारती

नजरेत साठल्या आठवणी, बालपण डोळ्यांपुढे, तरळले घरातल्या लाडक्या सुपुत्राचे, आज शुभमंगल ठरले ।
हसता खेळता पंख फुटले, उंबरठ्यावर उभा आज संसाराच्या घरात आनंद घेऊन येईल नवी सून ।
आस लागली तिच्या आगमनाची, बांधूनी बाशिंग कपाळी, राजा बेटा चालला आणायाला गृहलक्ष्मी ।
कुलदैवतांच्या कृपेने बहुरंगी संसाराची वेल ही बहरो ! कार्य सिद्धीस विघ्नहर्ता येतील,
कुलस्वामिनी आशीर्वाद देतील, आई-वडिलांचे गोड स्वप्न आशीर्वादाने नवजीवनात फुलो !

वि. वि. आमच्या येथे श्री कृपेकडून…

चि. रितिक (नैतिक)

(कै. सुदाम गोविंद देसाई यांचा नातू व
श्री. श्रीकांत सुदाम देसाई यांचा कनिष्ठ चिरंजीव,
मु. पो. कडगाव, ता. गडहिंग्लज,
जि. कोल्हापूर)

चि. सौ. कां. भारती (रित्वि)

(कै. लक्ष्मण धोंडू माने यांची नात व
श्री. महादेव लक्ष्मण माने यांची द्वितीय कन्या,
मु. गावरे, पो. नांदेट, ता. दापोली,
जि. रत्नागिरी)

शनिवार, ०५ डिसेंबर २०२६

मार्गशीर्ष कृष्ण पक्ष १२, शके १९४८
दुपारी १२:१६ मिनिटांनी

या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे. कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. तरी आपण सहकुटुंब, सहपरिवार व मित्रमंडळीसह उपस्थित राहून वधू-वरांस शुभाशीर्वाद द्यावेत, ही नम्र विनंती.

✿

हळदी समारंभ

शुक्रवार, दि. ०४ डिसेंबर २०२६

सायंकाळी ५:०० वा.

समृद्धी मंगल कार्यालय

⌖

विवाह स्थळ

समृद्धी मंगल कार्यालय,

कोल्हापूर बायपास, एस. के. मोटर्स समोर,

ता. निपाणी, जि. बेळगाव

⌂

निवासस्थान

श्रीस्नेह, नामदेव गल्ली,

मु. पो. कडगाव, ता. गडहिंग्लज,

जि. कोल्हापूर

❀

भोजन समारंभ

दुपारी १२ ते ३ वा.

(विवाहस्थळी)

श्रद्धा, सतीश, भक्ती, ओम, यशदा, तन्मय,
तृप्ती, त्रिशा, सुयश, तनया, गार्गी, चिन्मय